Monday, February 26, 2024

मन -ध्यान -ज्ञान

 मन म्हणजे काय ? मन कुठे असते ? त्याची निमिती कुठे व कशी होते ? एका मानवाला एकच मन असते की दोन मने असतात असे अनेक प्रश्न आहेत . प्रश्न पडल्याशिवाय माणसाला उत्तर सापडत नाही. ज्या माणसात जिज्ञासूवृत्ती असते ती व्यक्ती जास्तीत जास्त अभ्यासू व ज्ञानी बनतात.

          समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला सज्जन म्हटले आहे . त्याची , मनाची समजूत काढताना 205 मनाच्या श्लोकांची निर्मिती केली आहे . मनाचे श्लोक सर्वांना उपयोगाचे आहेत तरीही मनाचे प्रश्न सुटत नाही.

       खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी या आपल्या अहिराणी मातृभाषेत , बोलीभाषेत मनाबद्दल गाणे गाताना म्हणतात 

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर

किती हाकला हाकला फिरी येत पिकावर 

      मन नावाचे अवयव आपल्या शरीरात नाही . मन नावाचे इंद्रीयेही आपल्या शरीरात नाही तर मग मन निर्माण होते कसे ? 

मनाची संस्था ज्याने त्याने स्वतःच निर्माण केलेली असते . विचार करणारा प्राणी म्हणजे माणूस .  वर्तमानकाळात जीवन जगत असताना तो भूत -भविष्याचा विचार करून मन नावाच्या  संस्थेला जन्माला घालतो . भीती , चिंता , दोशीभाव  यामुळे भयभीत मन तयार होते. तर भविष्यकाळ माहीत नसताना त्याचे नियोजन यामुळे मन अस्थिर होते. 

         सदर व्यक्तीचे बालपण कसे जाते त्यावरून मनाची बांधणी होत असते . बाळपणीच मन खंबीर बनले पाहिजे 


   


No comments:

Post a Comment

मन -ध्यान -ज्ञान

  मन म्हणजे काय ? मन कुठे असते ? त्याची निमिती कुठे व कशी होते ? एका मानवाला एकच मन असते की दोन मने असतात असे अनेक प्रश्न आहेत . प्रश्न पड...